नारायण राणेच्या फार्म हाऊसजवळ कारमध्ये गुंडाचा मृतदेह

 


मुंबई- गोवा महामार्गावर तारा गावाच्या हद्दीत शुक्रवारी एका कारमध्ये अनोळखी व्यक्तीचा मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली. महामार्गावर केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या फॉर्म हाउसजवळ हा मृतदेह दोन दिवसांपासून गाडीत असल्याची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.

अधिक माहितीनुसार, मृत व्यक्तीचे नाव संजय कारले असे असून त्याच्या छातीमध्ये चार गोळ्या मारल्याच्या खुणा आढळून आल्या आहेत. तसेच तो पुण्यामधील गुन्हेगार असल्याचेही समोर आले आहे. संबंधित गाडी पुणे जिल्ह्यातील आहे. गाडी लॉक असल्याने गाडीतील मृतदेह बाहेर काढण्यास पोलिसांना अडचणी निर्माण झाल्या होत्या. मात्र, तज्ज्ञाच्या मदतीने दरवाजा उघडण्यात आला. मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठविण्यात येणार आहे.


Post a Comment

0 Comments