मोक्क्याच्या गुन्ह्यात फरार असणाऱ्या तीन आरोपींना अटक

 


पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तीनही आरोपी फरार असून त्यांच्यावर मोक्याअतंर्गत कारवाई केल्याने पोलीस त्यांच्या मागावर होतीच. यावेळी पोलिसांना चंद्रकांत उर्फ चंदू हा भारती विद्यापीठ येथे चोरून उपचारासाठी येणार असल्याची खबर पोलिसांना मिळाली. त्यानुसार कोंढवा पोलीस ठाण्याचे पोलीस अंमलदार अमोल हिरवे, अभिजीत रत्नपारखी, गणेश चिंचकर यांनी त्याला सापळा रचून ताब्यात घेतले. तपासात मिळालेल्या माहितीवरून त्याचे दोन साथीदार हे शेवाळे वस्ती येथे पत्र्याच्या रूममध्ये लपून बसल्याचे पोलिसांना समजले.

पोलिसांनी तेथे जाऊन करण विठ्ठल काळे (वय 25 रा. बिबेवाडी) व गणेश जयजयकार नाडे (वय 20 रा, बिबेवाडी) यांनाही पोलिसांनी पहाटे झोपेत असतानाच ताब्यात घेतले. याचा पुढील तपास सहायक पोलीस आयुक्त पोर्णिमा तावरे करत आहेत.


Post a Comment

0 Comments