चालत्या गाडीत गोळ्या घालून खून

 


आर्थिक व्यवहारातून चालत्या गाडीत गोळीबार करत खून केल्याप्रकरणातील दोन संशयित आरोपींची न्यायालयाने गुरुवारी निर्दोष मुक्तता केली.ही घटना 13 जानेवारी 2020 रोजी रात्री 9.30 वा.अल्ट्राटेक कंपनीसमोरील रस्त्यावर घडली होती.

किरण मल्लीकार्जुन पंचकट्टी (रा.गुलबर्गा,कर्नाटक) आणि त्याचा साथिदार लक्ष्मण कनटप्पा शिंदे (रा.सोलापूर) अशी निर्दोष मुक्तता करण्यात आलेल्या संशयितांची नावे आहेत.या दोघांनाही दत्ताराम बलभिम क्षेत्री (रा.झाडगाव एमआयडीसी,रत्नागिरी) याचा खुन केल्याप्रकरणी शहर पोलिसांनी अटक केली होती.त्यानूसार,किरण हा कर्नाटक येथे एकावर वार करुन पळून रत्नागिरीत दत्ताराम क्षेत्रीकडे येउन रहात होता.तेव्हा क्षेत्रीने किरणला मुद्रालोन मधून 9 लाखांचे कर्ज काढून व्यवसाय करण्याचा सल्ला दिला होता.त्यातील 3 लाख किरणने दत्ताराम क्षेत्रीला व्याजाने देउन उर्वरित 6 लाखांचा व्यवसाय सुरु केला होता.कालांतराने किरण हा क्षेत्रीकडे व्याजाची वारंवार मागणी करु लागला परंतू त्याचा राग आल्याने क्षेत्रीने किरणला व्याज देण्यास नकार देत त्याला मारहाणही केली होती.
याच राग मनात धरुन किरणने क्षेत्रीच्या आफीसमधील त्याचेच पिस्तुल चोरुन लक्ष्मण सोबत संगनमत करुन दत्ताराम क्षेत्रीला मारण्याचा कट रचला.त्याप्रमाणे 13 जानेवारी 2020 रोजी दत्ताराम क्षेत्री आपल्या ताब्यातील क्रेटा (एमएच-08-एपी-2097) मधून घरी जात असताना शेट्ये नगर स्टॉपजवळ किरणने क्षेत्रीला हात दाखवून गाडी थांबवली.त्यानंतर गाडीच्या मागील सिटवर बसल्यानंतर किरणे चालत्या गाडीत क्षेत्रीच्या डोक्याच्या मागील बाजुस गोळी मारली.त्यानंतर गाडी अल्ट्राटेक कंपनीच्या गेटच्या कंपाउंडवर आदळल्यानंतर किरणने गाडीतून पळ काढून लक्ष्मणला फोन करुन बोलावून घेत त्याच्याकडे गुन्ह्यातील पिस्तुल दिले होते.लक्ष्मणने ते पिस्तुल तो सिक्युरिटी गार्ड म्हणून काम करत असलेल्या ठिकाणी पालापाचोळ्यात लपवून ठेवत किरणला मदत केली होती.याप्रकरणी शहर पोलिसांनी दोघांनाही अटक करुन त्यांच्यावर दोषारोपपत्र न्यायालयात दाखल केले होते.हा खटला सुरु होता,याप्रकरणी आरोपींच्या वतीने अ‍ॅड.नेने यांनी केलेला युक्तिवाद आणि संशयाचा फायदा मिळाल्याने दोन्ही संशयित आरोपींची सबळ पुराव्या अभावी जिल्हा न्यायाधीश एल.डी.बिले यांनी निर्दोष मुक्तता केली.


Post a Comment

0 Comments