रस्ता ओलांडत असताना तरुणाचा अपघाती मृत्यू

 


राम प्रेमदास राठोड (वय 26, रा. पिरंगुट, पुणे) असे मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी मिथुन बंडू जाधव (वय 29, रा. ठाणे) यांनी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, अज्ञात वाहन चालकाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांच्या मामाचा मुलगा राम हा सोमवारी मध्यरात्री पावणे तीन वाजताच्या सुमारास चांदणी चौकातून पायी चालत जात होता.

तो रस्ता ओलांडत असताना त्याला भरधाव वेगाने आलेल्या अज्ञात वाहनाने धडक दिली. त्यात राम गंभीर जखमी झाला आणि त्यातच त्याचा मृत्यू झाला. अपघात घडल्यानंतर वाहन चालक घटनास्थळी न थांबता तिथून पळून गेला. हिंजवडी पोलीस तपास करीत आहेत.

Post a Comment

0 Comments