केंद्रीय राज्यमंत्री कौशल किशोर यांचा भाचा नंदकिशोर याच्या मृत्यूचं प्रकरण चर्चेत आले आहे. केवळ मृत व्यक्ती केंद्रीय मंत्र्यांचा नातेवाईक आहे म्हणूनच नव्हे तर त्याचं खासगं आयुष्यातील कहाणी कुणीही हैराण होईल.
जीवनाला कंटाळून नंदकिशोरनं आत्महत्येचा पर्याय निवडला. हे प्रकरण संपत्ती आणि कौटुंबिक कलह यातून नंदकिशोरनं टोकाचं पाऊल उचलल्याचं समोर आले आहे.
नंदकिशोर रावत हा केंद्रीय राज्यमंत्री कौशल किशोर यांचा भाचा आहे. तो प्रॉपर्टी डिलिंगचं काम करायचा. रावत भाजपाचा समर्थक होता. त्याचसोबत श्री बालाजी महाराज नावाच्या ट्रस्टचा अध्यक्ष होता. अनेक कार्यक्रमात, उत्सवात मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यासोबत बॅनर्सवर त्याचे फोटो झळकले आहेत. नंदकिशोरच्या मृत्यूची बातमी लखनौमध्ये वेगाने पसरली. खऱ्या आयुष्यात नंदकिशोर रावतनं २ लग्न केली होती. पहिली पत्नी हिंदू आणि दुसरी मुस्लीम. जिचं नाव शकीला होतं. २ पत्नीपासून मुलेही होती. ज्यात पहिली पत्नी पूजाकडून ४ आणि दुसरी पत्नी शकीलाकडून २ मुले होती.
जेव्हा नंदकिशोरनं शकीलासोबत दुसरं लग्न केले तेव्हा त्याची मुले मोठी होती. त्यांच्यावरून शकीला आणि नंदकिशोर यांच्यात कायद विवाद व्हायचा. या भांडणात पहिली पत्नी पूजाही नंदकिशोरला जबाबदार धरायची. नंदकिशोरनं २ पत्नी, मुले यांच्या नावावर अमाप संपत्ती खरेदी केली होती. हीच गोष्ट त्याच्या आयुष्यात काळ बनून आली. संपत्ती खरेदी-विक्रीवरून नेहमी घरात भांडणं व्हायची. जेव्हा दोन्ही पत्नीच्या मुलांना तो वेगवेगळ्या मालमत्ता खरेदी करायचा त्यावरून घरात कलह होत होता.
दोन्ही बायकांना समजावूनही भांडणं थांबत नव्हती. परंतु नंदकिशोरचं कुणीही ऐकलं नाही. त्यावरूनच तो सारखा चिंतेत असायचा. त्यामुळे त्याने भयानक पाऊल उचललं. तो गळफास घेऊन आत्महत्या करणार असल्याची भनकही दोन्ही पत्नीला लागली नाही. आता नंदकिशोरच्या जाण्यानं घरात शोककळा पसरली आहे. याबाबत पोलीस अधिकारी दिनेश सिंह म्हणाले की, बुधवारी या घटनेची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानंतर घटनास्थळी पोहचलेल्या पोलिसांना नंदकिशोर गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळला. पोलिसांनी मृतदेह खाली उतरवून पोस्टमोर्टमसाठी पाठवला. फॉरेन्सिक टीमकडून घटनास्थळाची पाहणी होत आहे. पुरावे म्हणून अनेक गोष्टी जमा केल्यात. ज्यात नंदकिशोरचं तुटलेला मोबाईलही हाती लागला आहे. घटनास्थळी पोलिसांना कुठलीही सुसाईड नोट आढळली नाही. सध्या या प्रकरणाचा पोलीस तपास करत आहे.
0 Comments