ट्रॅक्टरच्या ट्रॉलीचा धक्का लागून खाली पडलेल्या विवाहित महिलेच्या डोक्यावरून ट्रॉलीचे चाक गेल्याने महिलेचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना सोमवारी (दि. १४) संध्याकाळी ६.३० वा.
वारुळवाडी येथील भागेश्वर दूध डेअरीच्या समोर घडली अशी माहिती सहाय्यक पोलीस निरीक्षक पृथ्वीराज ताटे यांनी दिली. दरम्यान, ऊस वाहतूक करणाऱ्या चालकावर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
विद्या रमेश कानसकर (वय २३) रा. दौंडकरवाडी निमदरी, ता जुन्नर असे या अपघातात मृत्युमुखी पडलेल्या विवाहित महिलेचे नाव आहे. तर ट्रॅक्टर ट्रॉली चालक गोरक्ष सुखदेव ढेंबरे मु. पो. साकुर, ता. संगमनेर, जि. अहमदनगर याचेवर नारायणगाव पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहिती नुसार, रमेश कानसकर हे सोमवारी दि . १४ रोजी सायंकाळी सासु विमल जाधव आणि पत्नी विद्या यांच्या सोबत नारायणगांव येथे कानातील सोन्याचे दागिने खरेदीसाठी आले होते . त्यानंतर दुचाकी (एम.एच. १४ बी.एच. ३७६) वरुन नारायणगाव वरून वारूळवाडी - सावरगाव रस्त्याने घरी जात असताना वारुळवाडी येथील भागेश्वर दुध डेअरी समोर गतीरोधक असल्याने पत्नी विद्या गाडीवरुन खाली उतरली. तेंव्हा समोरून ट्रॅक्टर (एम.एच. १३ जे. ५३००) दोन ट्रॉल्या ऊसाने भरलेल्या येत होत्या , एक नंबरचे ट्रॉलीतील ऊसाचा विद्याला धक्का लागल्याने ती रोडवर पडली. त्यावेळी तिचे डोक्यावरुन ट्रॅक्टरचे चाक गेल्याने गंभीर जखमी झालेल्या विद्या यांना उपचारासाठी दवाखान्यात नेले असता डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले.
0 Comments