याप्रकरणी अनिकेत मोरे, धिरज सोनवणे यांच्यासह चाैघांना ताब्यात घेण्यात आले आहे. भरत भगवान कदम (24) असे खून करण्यात आलेल्या मॅनेजर तरूणाचे नाव आहे.याबाबत भरत याचा भाऊ प्रकाश कदम यांनी तक्रार केली आहे.
भरत हा गारवा बिर्याणी हॉटेलचा मॅनेजर होता. शनिवारी रात्री तो हॉटेल बंद करून दुचाकीने घरी निघाल्यानंतर नर्हे येथील श्री कंट्रोल चाैक रस्ता ते धायरेश्वर रसत्यावर दुचाकीवर आलेल्या हल्लेखोरांनी त्याच्यावर कोयत्याने सपासप वार करत त्याचा खून केला.याप्रकरणाचा सिंहगड रोड पोलिस तपास करत होते. हल्ल्याचे कारण अस्पष्ट होते. तर, भरतचे कोणाशी वाद देखील नव्हते. मात्र सहाय्यक पोलिस आयुक्त सुनिल पवार, वरिष्ठ पोलिस निरीक्षक शैलेश संखे, पोलिस निरीक्षक जयंत राजुरकर व त्यांच्या पथकाने आरोपींचा शोध सुरु केला होता.
स्थानिक पोलिसांचे इंटलिजन्स, तांत्रिक तपास व पोलिसांनी केलेल्या कैाशल्याने खून अनिकेत मोरे व त्याच्या इतर साथिदारांनी केला असल्याचे समोर आले. त्यानूसार, या चौघांना ताब्यात घेतले. तपासातून हा खून प्रेम प्रकरणातून झाल्याचे स्पष्ट झाले. अनिकेत मोरे याच्या मैत्रिणीने त्याच्याशी वाद झाल्यानंतर बोलणे बंद केले होते. ती भरत याच्याशी बोलत होती. त्याचा राग अनिकेतच्या मनात होता.त्यावरून काही महिन्यांपुर्वी भरत व अनिकेत यांच्यात वाद देखील झाले होते. त्यानंतर अनिकेतने भरत याचा काटा काढण्याचा प्लॅन रचला. त्याने अनिकेत कधी आणि कोणत्या रस्त्याने घरी जातो, याची रेकी केली. ही माहिती घेऊन त्याने या चौघांना पुरविली. त्यानंतर आरोपींनी भरत याचा दोन दिवसांपुर्वी रात्री साडे बाराच्या सुमारास घरी जात असताना खून केल्याचे समोर आले.
0 Comments