रस्ता ओलांडत असताना एका बसने तरुणीला चिरडलं. यात तरुणीचा जागीच जीव गेला. काळजाचा थरकाप उडवणारा हा भीषण अपघात सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झालाय.
फैज रोड येथे पायी चालत जाणाऱ्या 27 वर्षीय तरुणीचा दुर्दैवी अंत झाला. या तरुणीला धडक दिल्यानंतरही निर्दयी चालकाने गाडी थांबवली नाही. तिला तसंच फरफटत तो पुढे घेऊन गेला. त्यामुळे या घटनेची दाहकता अधिक वाढली.
रस्त्यावर रक्तबंबाळ अवस्थेत या मुलीचा मृतदेह पाहून सगळेच थबकले होते. या अपघातप्रकरणी पोलिसांनी आता पंचनामा केला असून पुढील तपास सुरु आहे.
0 Comments