ट्रॅक्टर - दुचाकीच्या धडकेत दोघांचा मृत्यु

 


निघोज-शिरूर रस्त्यावर समोर चाललेल्या टँकरला दुचाकीची धडक बसून झालेल्या अपघातात दोघे ठार झाले, तर एक जण जखमी झाला आहे. मंगळवारी सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास हा अपघात झाला.

पुढे चाललेल्या टँकर चालकाने कोणताही इशारा न देता टँकर वळविल्याने हा अपघात झाल्याचे जखमीने सांगितले.

नीलेश गणेश रासकर (वय 30), कांताराम भिका भाकरे (वय 53) अशी मृतांची नावे असून, संपत नामदेव भामरे (वय 30) हा जखमी झाला आहे.

नीलेश रासकर हा संपत भामरे व कांताराम भाकरे या दोघांसह दुचाकीवरून जात होता. निघोज-शिरूर रस्त्यावरील कन्हैय्या उद्योग समूहाजवळ ते आले असता, पुढे चाललेल्या टँकरच्या चालकाने अचानक कन्हय्या दूध समूहाकडे टँकर वळविला. त्यामुळे पाठीमागून येणाऱया दुचाकीची टँकरला जोराची धडक बसून दुचाकीवरील तिघेही रस्त्यावर पडले. जखमींना तातडीने शिरूर येथील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र, उपचारापूर्वीच नीलेश रासकर व कांताराम भामरे यांचा मृत्यू झाला. दुचाकीवर दोघांच्या मध्ये बसलेला संपत भामरे हा जखमी झाला. त्याने दिलेल्या माहितीनुसार निघोज दूरक्षेत्रात गुन्हा दाखल करण्यात आला.


Post a Comment

0 Comments