गाडी चालवताना कट मारल्याच्या कारणातून झालेल्या वादावादित तिघांनी एका व्यक्तीच्या डोक्यात दगड घालून जिवे ठार मारण्याचा प्रयत्न केला. याप्रकरणी चंदननगर पोलिसांनी आदि रईस मलिक (वय 18, रा.
बिडी कामगार वसाहत, चंदननगर) आणि निखिल सुभाष दरेकर (वय 19, रा. अष्टविनायक नगर, चंदननगर) यांना अटक केली आहे. तर, त्यांच्या साथीदाराविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. याबाबत बशीर तांबोळी (वय 46, रा. केशवनगर, मुंढवा) यांनी चंदननगर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
ही घटना जुना मुंढवा बंधारा रोडवर मंगळवारी (दि.8) रात्री नऊ वाजता घडली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे त्यांच्या मुलाला जेवणाचा डब्बा घेऊन निघाले होते. त्या वेळी समोरून दुचाकीवर ट्रिपल सीट आलेल्यांनी त्यांच्या दुचाकीला कट मारला. तेव्हा त्यांनी 'अरे, गाडी बघून सावकाश चालव,' असे म्हटले. यावरून आरोपीने फिर्यादींच्या दुचाकी पुढे गाडी आडवी घालून शिवीगाळ केली. त्यांच्यातील एकाने, 'याला धरा, इथेच याला ठार करू,' असे म्हणून जिवे ठार करण्याच्या उद्देशाने त्यांच्या डोक्यात दगड घातला. तर, दुसर्याने दगड तोंडावर मारला. सहायक पोलिस निरीक्षक कांबळे अधिक तपास करीत आहेत.
0 Comments