गटारामध्ये पडून महिलेचा मृत्यू

 


उघड्या गटारात कडून एका महिलेचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना विरार येथे उघडकीस आली आहे. कमलाबेन मेहता(६८) असे या महिलेचे नाव आहे. या प्रकरणी विरार पोलिसांनी  अपपमृत्यूची नोंद केली आहे.

विरार पश्चिमेच्या एमबी इस्टेट मध्ये राहणाऱ्या कमलाबेन शहा या दररोज सकाळी विरारच्या जैन मंदिरात जायच्या.

सोमवारी जैन मंदिरात होणाऱ्या एका धार्मिक प्रवचनासाठी त्यांनी पहाटेवसाडेपाच वाजता घर सोडले होते. सकाळचे आठ वाजले तरी त्या घरी न परतल्याने त्यांच्या कुटुंबियांनी शोध सुरू केला होता. मात्र त्यांचा कुठेही पत्ता लागला नाही. त्या बेपत्ता होऊन २४ तास उलटले नसल्याने पोलिसांनी तक्रार दाखल करून घेतली नव्हती. त्यामुळे कुटुंबीयांनी समाज माध्यमाद्वारे त्यांना शोधण्यासाठी आवाहन केले होते.

दरम्यान, संध्याकाळी पाच वाजता विरारच्याच एमबी इस्टेट परिसरात असलेल्या एका गटारामध्ये एका महिलेचा मृतदेह आढळून आला. विरार पोलिसांनी अग्निशमन दलाच्या सहाय्याने हा मृतदेह बाहेर काढला. हा मृतदेह बेपत्ता असलेल्या कमलाबेन मेहता यांचा असल्याचे नंतर उघड झाले 

मेहता यांना स्मृतिभ्रंश तसेच मणक्याचा आजार होता. त्यांचा मृतदेह गटारातून बाहेर काढण्यात आला आहे. याप्रकरणी अपमृत्यूची नोंद करण्यात आली आहे. मात्र त्यांचा मृत्यू नेमका कशाने झाला त्याचा तपास सुरू आहे, अशी माहिती विरार पोलीस ठाण्याचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक सुरेश वराडे यांनी दिली.


Post a Comment

0 Comments