तळेगावात १९ वर्षीय तरुणाचा खून,

 


तळेगावमध्ये एका महाविद्यालयीन तरुणाचा हकनाक बळी गेला आहे. २० ते २५ जणांच्या टोळक्याने कोयता आणि लोखंडी रॉडने वार करून तरुणाची हत्या करण्यात आली आहे. या घटनेमुळे तळेगावात एकच खळबळ उडाली आहे.

प्रणव उर्फ जय मांडेकर वय- १९ वर्षे अस हत्या झालेल्या तरुणाच नाव आहे. तो इंद्रायणी कॉलेजमध्ये एफ.वाय. बी.कॉमचे शिक्षण घेत होता. या प्रकरणी तळेगाव पोलिसांनी काही जणांना ताब्यात घेतले आहे. मयत प्रणव हा मित्राचा वाढदिवस साजरा करण्यासाठी घराबाहेर पडला होता परंतु, सोबत असलेल्या तरुणाची एका सोबत फोनवर बाचाबाची झाली. त्या तरुणाला मारण्यासाठी २० ते २५ जणांचे टोळके तिथे आले व त्यांच्याकडून प्रणवला त्यांचा साथीदार समजून त्याची हत्या करण्यात आली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रणव हा मित्राचा वाढदिवस आहे असे सांगून घराबाहेर पडला होता. रात्री साडे नऊच्या सुमारास आई स्वाती यांनी मुलगा प्रणवला फोन केला तेव्हा त्याने जेवण झाले आहे निघतच आहे असे म्हणून फोन ठेवला. मात्र, दीड तास उलटला तरी मुलगा का आला नाही म्हणून पुन्हा आईने फोन केला आणि तो फोन तळेगाव पोलिसांनी उचलला आणि प्रणवचा खून झाल्याचे आईला सांगितले.


Post a Comment

0 Comments