आत्महत्येचा बनाव , 16 वर्षीय मुलीची हत्या

 


जन्मदात्या पित्यानेच आपल्या पोटच्या सोळा वर्षे मुलीची हत्या केली. ही घटना नागपुरात उघडकीस आली. मुलीने आत्महत्या केल्याचा बनाव करण्यात आला. स्वतःच सुसाईड नोट सुद्धा मुलीच्या नावाने लिहून ठेवण्यात आले.

मात्र पोलीस तपासात ही घटना उघड झाली. पोलिसांनी आरोपी त्याला बेड्या ठोकल्या. गुड्डू रज्जक नावाच्या एका पित्यानेच हे कृत्य केलं. आपल्या दुसऱ्या पत्नीला फसवण्यासाठी स्वतःच्या मुलीच्या आत्महत्येचा बनाव करत मुलीची हत्या केली. दुर्दैवी घटनेने मोठी हळहळ व्यक्त होत आहे.

कळमना पोलीस स्टेशन हद्दीतील ही घटना आहे. आरोपी पित्याला पहिल्या पत्नीपासून तीन मुलं आहेत. त्यात सोळा वर्षाची मुलगी ही मोठी आहे. पत्नीच्या मृत्यूनंतर त्यानं दुसर लग्न केलं. मात्र पत्नीसोबत न राहता वडिलांच्या घरीच जास्त राहत होती. तिला आणि तिच्या परिवाराला धडा शिकविण्यासाठी त्याने मुलीचा सहारा घेतला.


Post a Comment

0 Comments