डबल सीट बसून या महिलेने असा आगाऊपणा केला, जैसे ज्याचे कर्म तैसे


कधी काही लोक विचार न करता अशा गोष्टी करतात, ज्याचा वाईट परिणाम त्यांना सहन करावा लागतो. मात्र आजकाल लोक अशा घटनांना ‘इन्स्टंट कर्मा’ असं म्हणतात. म्हणजे एखाद्या सोबत तुम्ही काही वाईट केलंत तर तुमच्या सोबतही लगेच असंच काहीसं होतं.

त्यामुळे इतरांच्या आयुष्यात जर तुम्ही विघ्न आणणार असाल तर थोडी काळजी घ्या नाहीतर तुम्हीही खड्ड्यात जाल. नुकताच व्हायरल झालेला एक व्हिडिओ याच गोष्टीचं उत्तम उदाहरण आहे. एक मुलगी दुचाकीवर डबल सीट बसलेली असते. गाडीवरून जाताना ती दुसऱ्या गाडीवरच्या महिलेला लाथ मारायला जाते. मग काय…इन्स्टंट कर्मा!

या व्हिडीओमध्ये दोन वाहने शेजारी-शेजारी रस्त्यावरून जाताना दिसत आहेत. रस्त्याच्या कडेला एक पुरुष चालक आणि एक महिला स्कूटी वरून जात आहेत, शेजारीच दुसरी दुचाकी आहे. ही दुचाकी दुसरी महिला चालवत आहे.

पुरुष ड्रायव्हरच्या मागे बसलेली महिला या दुसऱ्या दुचाकीवरच्या महिलेला लाथ मारताना दिसते. आरोपी महिला बाईकचा तोल बिघडवण्याचा प्रयत्न करत होती, मात्र असं करताना तिचा तोल गेला आणि ती टू-व्हीलरवरून खाली पडली.

इंटरनेटवर लोकांनी बाईकला लाथ मारणाऱ्या मुलीची खिल्ली उडवली, कारण ती लाथ मारल्यानंतर लगेचच स्कुटीवरून पडलीये.


Post a Comment

0 Comments