जमिनीच्या वादातून भावाकडून चुलत बहीणचा खून

 


शिरूर तालुक्यामध्ये जमिनीच्या वादातून केंदूर येथील महादेववाडीमध्ये एका भावाने जमिनीच्या वादातून आपल्या सख्ख्या चुलत बहिणीचा कोयत्याने वार करत खून केल्याची घटना घडली आहे.

आशा भागोजी साकोरे असे खून करण्यात आलेल्या महिलेचे नाव आहे, तर विलास यशवंत साकोरे असे पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या आरोपी भावाचे नाव आहे.

केंदूर येथील महादेववाडीमधील विलास साकोरे व त्याची चुलत बहीण आशा साकोरे यांच्यात जमिनीच्या वाटपातून वाद सुरू होते. अनेक दिवस वाद सुरू असल्याने आज सायंकाळच्या सुमारास आशा या घरासमोरील रस्त्याने जात असताना विलास साकोरे हा कोयता घेऊन त्यांच्या जवळ आला आणि आशा यांच्या डोक्यावर व अंगावर वार केले. यावेळी रक्ताच्या थारोळ्यात पडून आशा यांचा जागीच मृत्यू झाला.


Post a Comment

0 Comments