शेतात शौच करण्यास मनाई केली म्हणून एका माथेफिरुने तरुणाची निर्दयीपणे हत्या केल्याची घटना उत्तर प्रदेशातील महोबा जिल्ह्यात घडली आहे.
मयत सोनूचे वडिल जीत विश्वकर्मा यांनी दिलेल्या माहितीनुसार, काही दिवसांपूर्वी सोनूने राजकुमारला शेतात शौच करण्यास मनाई केली होती. यावरुन राजकुमार आणि सोनू यांच्यात जोरदार वादावादी झाली होती. त्यावेळी राजकुमारने सोनूला जीवे मारण्याची धमकी दिली होती.
यानंतर राजकुमार खूप चिडला होता. सोनूविषयी त्याच्या मनात प्रचंड खुन्नस निर्माण झाली होती. काल रात्री सोनू शेतात राखण करण्यासाठी गेला होता. यावेळी राजकुमार कुऱ्हाडीने वार करुन त्याची हत्या केली.
0 Comments