तरूणाने तरूणीच्या कानशिलात लगावून शिवीगाळ करत तिचा विनयभंग केला. ही घटना दिवसाढवळ्या देहूरोड पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 25 वर्षीय पीडित तरूणीने देहूरोड पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यानुसार दीपक सूर्यकांत गावडे (रा. साईनगर, गहूंजे) वर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
3 नोव्हेंबर दुपारी दोनच्या सुमारास फिर्यादी तरूणी ब्युटी पार्लरच्या कोर्ससाठी पायी जात होती. त्यावेळी दीपक दुचाकीवरून आला आणि त्याने तिला अडविले. तू माझ्याशी का नाही बोलत असे म्हणून त्याने तरूणीच्या थोबाडीत मारले. तिचा विनयभंग केला. तरूणी ओरडू लागल्यानंतर त्याने तिला शिवीगाळ केली व घरच्यांना जीवे मारण्याची धमकी देऊन दीपक तेथून पळून गेला. त्यानंतर तरूणीने देहूरोड पोलीस ठाण्यात दीपक विरोधात तक्रार दाखल केली.
0 Comments