योजना शिवशंकर महंत (वय ३२, रा. मोशी) असे मृत्यू झालेल्या महिलेचे नाव आहे. तर, त्यांचा मुलगा शिवांश महंत हा गंभीररित्या अपघात झाला आहे. याप्रकरणी अमोल सुरवसे यांनी तक्रार दिली असून अज्ञात कार चालकाविरोधात सिंहगड रोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या प्रकरणी अधिक माहिती अशी की अमोल सुरवसे आणि शिवशंकर महंत हे दोघे कुटुंबासह रत्नागिरी येथे पर्यटनासाठी निघाले होते. रविवारी पहाटे साडे सहाच्या सुमारास त्यांची कार नवले ब्रिजच्या पुढे एका हॉटेलसमोर उभी होती. कारमध्ये बसण्यासाठी ते पायी चालत जात होते. त्याचवेळी पाठिमागून आलेल्या भरधाव कारने त्यांना अमोल, शिवशंकर व त्यांची पत्नी योजना आणि मुलगा शिवांश यांना जोराची धडक दिली. यात योजना यांचा मृत्यू झाला तर, मुलगा गंभीर जखमी झाला.अपघातानंतर चालक तेथून पसार झाला. याघटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. दरम्यान, पसार झालेल्या कार चालकाचा पोलिसांकडून शोध घेतला जात आहे. अधिक तपास सिंहगड रोड पोलीस करत आहेत.
0 Comments