जेसीबीच्या धडकेत दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यु

 



अर्जुन मछिंद्र पौळ (वय 26) असे मृत्यू झालेल्या दुचाकीस्वाराने नाव आहे. याप्रकरणी लक्ष्मण रावसाहेब मुळे (वय 36, रा. चिखली. मूळ रा. बीड) यांनी चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार राकेश राजेंद्र पाटील (वय 20, रा. रासे, ता. खेड. मूळ रा. जळगाव) याला पोलिसांनी अटक केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचा भाचा अर्जुन हा बुधवारी सायंकाळी चाकण शिक्रापूर रोडने दुचाकीवरून जात होता. कडाचीवाडी येथे आल्यानंतर आरोपी जेसीबी चालकाने त्याच्या ताब्यातील जेसीबी हलगर्जीपणे चालवून दुचाकीला धडक दिली. अर्जुन याच्या पोटात जेसीबीच्या लोडरचा लोखंडी दात घुसल्याने गंभीर जखमी झालेल्या अर्जुनचा जागीच मृत्यू झाला. चाकण पोलीस तपास करीत आहेत.

Post a Comment

0 Comments