जंगलात आढळून आले तरूण - तरुणीचा मृतदेह

 


उदयपूर जिल्ह्यातील गोगुंदा भागातील उबेश्वरच्या जंगलामध्ये शुक्रवारी एका अज्ञात तरूण-तरूणीचा मृतदेह आढळल्याने एकच खळबळ उडाली. याची सूचना मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी तपास सुरू केला.

कॉन्स्टेबल विजेश कुमार यांनी सांगितलं की, सकाळी 7.30 वाजता जंगलात मृतदेह पडून असल्याची माहिती मिळाली होती. घटनास्थळी जाऊन पाहिलं तर मजावदपासून साधारण 200 मीटर अंतरावर जंगलात तरूण आणि तरूणीचा मृतदेह आढळून आला. तरूणीने कुर्ती आणि लेगिंग घातली होती. तरूणाने जीन्स आणि शर्ट. दोघांचेही मृतदेह विचित्र स्थितीत होते. तरूणाचा प्रायव्हेट पार्ट कापलेला होता. तसेच दोघांच्या मृतदेहाखाली मोबाइल चार्जर केबल आढळून आला.

पोलिसांनुसार, दोघांचंही वय साधारपणे 30 च्या आसपास आहे. प्राथमिक पाहणीत दिसून येतं की, आधी दोघांना मोठ्या दगडांनी मारण्यात आलं आणि नंतर धारदार हत्याराने वार करून त्यांची हत्या करण्यात आली. पीडितेच्या प्रायव्हेट पार्टमध्येही जखमा आहेत. तरूणाचं नाव राहुण मीणा असून तो शिक्षक होता.

तर तरूणीचं नाव सोनू सिंह असून ती 28 वर्षांची होती. पीडित पुरूष आदिवासी समुदायाचा होता तर तरूणी राजपूत होती. दोघांचेही घरे 10 किलोमीटर अंतरावर असलेल्या गावात आहेत. पोलीस म्हणाले की, दोघांच्याही जाती पाहता ही केस ऑनर किलिंगची वाटत आहे.


Post a Comment

0 Comments