जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. शाळेतील मुलींशी शिक्षकाने असभ्य लैंगिक वर्तन केल्याचा संतापजनक प्रकार समोर आला आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील पोर्ले इथल्या शाळेतून ही धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.
याचा मुलींनी इतका घसका घेतला की मुली शाळेतच जात नव्हत्या. मुली शाळेत का जात नाही याची चौकशी केली असता चौकशीतून हा संतापजनक प्रकार उघडकीस आला आहे. नामदेव पवार असं या प्रकरणात आरोप असलेल्या शिक्षकाचं नाव आहे. घटनेबाबत अधिक माहिती अशी की, कोल्हापूर जिल्ह्यातील पोर्लेमध्ये असलेल्या एका शाळेत हा प्रकार घडला आहे.
नामदेव पवार असं आरोप असलेल्या या शिक्षकाचं नाव आहे. काही दिवसांपासून मुली शाळेत जात नव्हत्या. मुली शाळेत का जात नाही याची चौकशी केली असता हे प्रकरण समोर आले आहे. या प्रकाराने पालकांना देखील धक्का बसला आहे.
या प्रकरणी संभाजी ब्रिगेडकडून संबंधित शाळेच्या मुख्यध्यापकांना जाब विचारण्यात आला आहे. तसेच संबंधित शिक्षकांना बडतर्फ करण्याची मागणी देखील संभाजी ब्रिगेडच्या वतीने करण्यात आली आहे.
0 Comments