सव्वा लाखाच्या कापसाची चोरी

 


नेवासा शहरातील फळांचे व्यापारी व राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष गफूरभाई बागवान यांच्या शेततात वेचलेल्या कापसावर मंगळवारी मध्य रात्री चोरट्यांनी डल्ला मारला.

शेतातील खोलीमध्ये ठेवलेला सुमारे सव्वा लाखाचा कापसाची चोरी झाली आहे. चोरट्यांनी बाजूच्या शेतात वाहन उभे करून कापूस लंपास केला. याबाबत गफूरभाई बागवान यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, धनगरवाडी रस्त्यावर असलेल्या साडेचार एकर शेतात कापसाचे पीक घेतले होते. शेतातील कापूस वेचून झाला होता. सतरा ते अठरा क्विंटल असलेला कापूस सुरक्षेच्या द़ृष्टीने शेतातील खोलीत ठेवला होता.

बुधवारी सकाळी शेतात आलो असता, खोलीचा दरवाजा उघडा व कुलूप तुटून बाजूला पडलेले दिसले खोलीतून सुमारे साडेतेरा क्विंटल कापूस आजच्या भावाप्रमाणे सुमारे सव्वा लाखाचा कापूस चोरीस गेलेला निदर्शनास आले रस्त्याचा माग काढला असता शेजारील शेतात छोटा हत्तीसारखे वाहन ी उभे करून सदरचा कापूस चोरून नेला असल्याचे म्हटले आहे.

या घटनेची खबर बागवान यांनी तक्रार दिल्यानंतर पोलिस निरीक्षक विजय करे यांनी पोलिस हवालदार तुळशीराम गीते यांच्यासमवेत तातडीने घटनास्थळी भेट देऊन परिसराची पाहणी केली. तसेच नगर येथून आलेल्या ठसे तज्ज्ञांनी परिस्थितीची पाहणी घटनास्थळी जाऊन केली. शेतकरी गफूरभाई बागवान यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसांनी चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल केला. पोलीस चोराट्यांचा शोध घेत आहेत.


Post a Comment

0 Comments