प्रेमविवाहाला आजही समाजात विरोध होतोच. सामाजिक प्रतिष्ठेपायी हसती खेळती नाती कधी एकमेकांचे शत्रू बनतात ते समजत नाही. नागनाथ मंजुळे यांच्या 'सैराट' चित्रपटातून एका प्रेमविवाहाची आणि वास्तवाची मांडणी समोर आली होती
याच कथानकाशी मिळतीजुळती घटना डिसेंबर 2015 मध्ये कोल्हापुरात घडली. बहिणीने केलेल्या प्रेमविवाहाबद्दल लोकांनी चिडवल्याच्या रागातून सख्ख्या भावांनी बहिणीला आणि तिच्या पतीला संपवले. या घटनेने एक पिढीच लयाला गेल्याची भीषणता समोर आली.
शाहूवाडी तालुक्यातील सरुड गावचा 23 वर्षांचा मुलगा इंद्रजित कुलकर्णी याचे शालेय जीवनातील प्रेम त्याला मिळाले. मेघा पाटील या मुलीशी त्याने 2015 पूर्वी प्रेमविवाह केला. मात्र, त्यांना घरच्यांचा मोठा विरोध झाला. दोघांनी गाव सोडले. वर्षभर वेगवेगळ्या ठिकाणी राहिल्यानंतर दोघे कसबा बावड्यातील गणेश कॉलनीत राहण्यास आले. या घरात सहा महिने राहिले. पतीला हातभार लावावा या उद्देशाने मेघा एका मॉलमध्ये नोकरीला गेली. तिथे तिच्या भावाने तिला पाहिले.
0 Comments