याप्रकरणी 47 वर्षीय सासूने 30 वर्षीय जावयाच्या विरोधात चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिला आणि त्यांची नात घरी असताना आरोपी जावई घरी आला. त्याने फिर्यादीस शिवीगाळ करून त्यांचे डोके भिंतीवर जोरात आपटले. त्यानंतर फिर्यादी सोबत गैरवर्तन करून त्यांचा विनयभंग केला. हा प्रकार सुरु असताना फिर्यादींचा मुलगा घरी आला असता आरोपीने मुलाला देखील मारहाण केली आणि पळून गेला. चिखली पोलीस तपास करीत आहेत.
0 Comments