कोंबड्यांवर ताव मारताना बिबट्या अडकला

 


कवठे येमाई (ता. शिरूर) येथील इनामवस्ती येथे बिबट्याने अक्षय कांदळकर यांच्या कोंबड्याच्या खुराड्यात कोंबड्यावर ताव मारण्यासाठी प्रवेश केला.

बिबट्या पुरता दहा मिनिटे अडकून पडला. यावेळी बाहेर पडण्यासाठी मार्ग नसल्याने खुराड्याचा पत्रा उचकटून बिबट्याने धूम ठोकली. यात तीन कोंबड्या फस्त केल्या होत्या. ही घटना शनिवार (दि. 19) रात्री दहा वाजता घडली.
थंडीमुळे कांदळकर यांचे घर बंद होते. त्यांच्या घराशेजारी कोंबड्यांचे खुराडे बनविलेले आहे. कोंबड्यांचा जोर जोराचा आवाज आल्याने कांदळकर यांनी बाहेर येऊन पाहिले. त्यांना कोंबड्यांच्या खुराड्यात बिबट्या दिसून आला. त्यांनी आरडाओरडा केला असता बिबट्याने खुरड्यातून बाहेर निघण्याचा प्रयत्न केला. परंतु त्याला बाहेर निघणे कठीण झाले. 
खुराड्याला छोटा दरवाजा असल्यामुळे बिबट्या दहा मिनिटे खुराड्यात अडकून पडला. बिबट्याने बाहेर निघण्याचा खूप प्रयत्न केला. परंतु त्याला दरवाजाचा मार्ग न सापडल्याने त्याने अखेर खुराड्याचे पत्रे उचकटून बाहेर उडी मारली. उसाच्या शेतात धूम ठोकली.
अक्षय बाहेर येण्यापूर्वीच बिबट्याने तीन कोंबड्या खाऊन फस्त केल्या होत्या. खुराड्यातील उर्वरित कोंबड्या जखमी झाल्या आहेत. दरम्यान आरडाओरडा झाल्याने रहिवाशांनी गर्दी केली होती. 
भीतीचे वातावरण पसरले आहे. सविंदणे येथील अक्षय अर्जुन शिंदे यांच्या घराशेजारील कोबडयाच्या खुराड्याजवळ बिबटया दिसल्याने परीसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

Post a Comment

0 Comments