पोलिस असल्याची बतावणी करून पाच लाख उकळले ,एकाला अटक


 मधुकर विलास सापळे (वय 32, रा. आंबेगाव) असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपीचे नाव आह. अजय गुलाबराव भोसले (वय 32) त्यांनी या प्रकरणी तक्रार दिली आहे. चंदन नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

अधिक माहिती अशी की, आरोपीने फिर्यादीला  एप्रिल ते जून या कालावधीत पोलीस असल्याची बतावणी करून फिर्यादी विरोधात वेगवेगळ्या गुन्हा कोर्टात केसेस सुरू आहेत आणि आणखी गुन्हे दाखल करण्याची खोटी भीती दाखवली. तसेच फिर्यादी राहत असलेल्या सोसायटीची निवडणूक रद्द करण्यासाठी वेळोवेळी त्यांच्याकडून तब्बल पाच लाख 5 हजार रुपये खंडणी स्वरूपात स्वीकारले. पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला असून अधिक तपास सुरू आहे.


Post a Comment

0 Comments