दोन बिबट्याचा तलावाजवळ मृत्यु

 


मेळघाट व्याघ्र प्रकल्पाच्या सिपला वन्यजीव विभागात सेमाडोह रायपुर मार्गावर एका तलावाजवळ दोन बिबट्या मृतावस्थेत आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. मृतावस्थेतेतील एक बिबट्या चार वर्षाचा आणि दुसरा दीड वर्षाचा आहे.

सीमाडोह रायपूर मार्गावर आत मध्ये असणाऱ्या असेरी वनखंड क्रमांक 161 मध्ये व्याघ्र प्रकल्पाच्या तलावाजवळ एक बिबट्या बेशुद्ध अवस्थेत पडलेला आढळून आला त्याची तपासणी केली असता तो दगावल्याचे वन कर्मचाऱ्यांना आढळून आले. तेथून काही अंतरावरच दीड वर्षीय मादी बिबट्यादेखील मृत अवस्थेत आढळून आली.

Post a Comment

0 Comments