मुलगी मोबाईलचा अतिवापर करत असल्याचे वडिलांच्या लक्षात रागावले होते. वडिल ओरडल्याचा राग मनात धरत युवतीने विष प्राशन करून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे.
आरती सुनील सिदलंबे (वय २०) असे आत्महत्या केलेल्या युवतीचे नाव आहे. ती महाविद्यालयात शिक्षण घेत होती.
आरतीने विष प्राशन केल्यानंतर तिला उपचारासाठी घाटी रुग्णालयात दाखल करण्या आले होते. पण, उपचार सुरू असताना तिचा मृत्यू झाला आहे. शहरातील गारखेडा परिसरातील न्यू हनुमाननगरमध्ये ही घटना घडली आहे. गारखेड्यातील न्यू हनुमाननगरमध्ये कुटुंबासह राहणारी आरती पदवीच्या दुसऱ्या वर्षात शिक्षण घेत होती.
आरतीचे वडील 18 डिसेंबर रोजी सुनील सिदलंबे हे काम आटोपून घरी परतले. त्यावेळी त्यांना आरतीच्या हातात मोबाइल दिसला. यामुळे ते रागावले होते. मोबाइलच्या अतिवापर करत असल्यामुळे आई-वडिलांनी आरतीला अनेकदा समजावून सांगितले होते. मात्र आरतीच्या अति मोबाईल वापरण्याची सवय कमी झाली नाही. रविवारी आरतीच्या हातात मोबाइल पाहून वडील तिला पुन्हा रागावले आणि याचाच राग मनात धरत आरतीने टोकाचे पाऊल उचलत आत्महत्या केली. पोलिस पुढील तपास करत आहेत.
0 Comments