यवत : कार व दुचाकीच्या अपघातात दुचाकीस्वार महिला जागीच ठार झाल्याची घटना पुणे - सोलापूर महामार्गावर भांडगाव (ता.
दौंड) परिसरात घडला.पुणे सोलापुर महामार्गावर असलेल्या भांडगाव येथील हॉटेल झोपडी जवळ दि.०४ रोजी दुपारी ११.३० च्या सुमारास मनिषा संतोष सुर्यवंशी ( रा.भांडगाव, ता.दौंड , जि.पुणे ) या टी.व्ही.एस कंपनीच्या ज्युपीटर दुचाकीसह रस्ता ओलांडत होत्या, यावेळी पुणेवरुन सोलापूर कडे जाणाऱ्या मारुती कंपनीची कार( एम.एच.१४ जी.एच.५६६४ ने धडक दिल्याने सदर महिलेस डोक्यास, हातपायांना दुखापत झाल्याने उपचारांसाठी यवत ग्रामीण रुग्णालय येथे घेऊन गेले असता डॉक्टरांनी मयत झाल्याचे सांगितले. याबाबतीत निलेश दत्तात्रय सुर्यवंशी ( रा. वरवंड ) यांनी यवत पोलिस स्टेशन येथे कार चालक कुंडलिक सदाशिव आनंदकर ( वय ६५, रा. पिंपरी चिंचवड )यांच्या विरोधात फिर्याद दिली असुन पुढील तपास यवत पोलिस करीत आहेत.
0 Comments