गारुड्याने पुंगी वाजवताच दारुड्याने काढला फणा

 


सोशल मीडियावर एका दारुड्याच्या नागिन डान्सचा भन्नाट व्हिडीओ वेगानं व्हायरल होत आहे. गारुड्यानं पुंगी वाजवल्यावर एका दुकानात असलेला दारुड्या नागासारखा फणा काढून बाहेर येतो.

गारुड्याही पुंगीवर त्याला थिरकवण्यचा प्रयत्न करतो. पण हा पठ्ठ्या नशेत टुल्ल होऊन गारुड्याच्या अंगावर येतो आणि नागासारखा फणा मारण्याचा प्रयत्न करतो. हा सर्व मजेशीर प्रकार कॅमेरात कैद झाला असून व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे. नेटकऱ्यांनाही हा व्हिडीओ पाहिल्यानंतर हसू आवरलं नाहीय. व्हिडीओ पाहून नेटकरी भन्नाट प्रतिक्रिया देत आहेत. हा कुणाचा मित्र आहे? असं मजेशीर कॅप्शन देऊन हा व्हिडाओ शेअर करण्यात आला आहे.

या व्हिडीओत एक गारुडी पुंगी वाचवताना दिसत आहे. पुंगीच्या तालावर दुकानात असलेला एक व्यक्ती नागासारखा फणा काढून भन्नाट डान्स करताना दिसत आहे. गारुड्यापुढं दारुड्याचे ठुमके पाहून नेटकऱ्यांना आश्चर्याचा धक्का बसला आहे. इंटरनेटवर व्हायरल झालेल्या या व्हिडीओला नेटकऱ्यांचा जबरदस्त प्रतिसाद मिळत असून व्हिडीओ शेअरही केला जात आहे. याआधीही अशाच प्रकारचे भन्नाट व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. दारुड्याचा भन्नाट डान्स पाहून नेटकऱ्यांचं मनोरंजन तर झालंच आहेच, याशिवाय नेटकरीही या व्हिडीओवर प्रतिक्रियांचा वर्षाव करत आहेत.

Post a Comment

0 Comments