इंदापूर तालुक्यात चोरट्यांचा धुमाकूळ, तब्बल 6 लाखांचे दागिने लुटले

 


इंदापूर तालुक्यात एकाच रात्रीत दोन वेगवेगळ्या गावांमध्ये झालेल्या घरफोड़्यांमध्ये अज्ञात चोरट्यांनी तब्बल ६ लाखांचे सोन्याचे दागिने लुटले.

इंदापूर तालुक्यातील सराटी व कचरवाडी या दोन गावांत हा प्रकार घडला. कचरवाडी येथील भाऊसाहेबनगर येथील विलास सदाशिव गायकवाड यांच्या घरी तसेच सराटी येथील रघुनाथ शिवाजी कोकाटे यांच्या घरी घरफोडी करून चोरट्यांनी रोकड रक्कम व सोने, चांदीचे मिळून ६ लाख ५६ हजार ७२० रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला.

या प्रकरणी विलास गायकवाड यांनी इंदापूर पोलिसांकडे फिर्याद दिली असून पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. या गुन्ह्याचा तपास पोलिस निरीक्षक टी.वाय. मुजावर यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक निरीक्षक नागनाथ पाटील करीत आहेत.


Post a Comment

0 Comments