दारुड्या पतीच्या मारहाणीचा कंटाळून पत्नीने पतीला जिवंत जाळण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. पती रोज दारूच्या नशेत येऊन पत्नीला मारहाण करायचा यामुळे पत्नीला प्रचंड त्रास सहन करावा लागत होता.
अखेर एके दिवशी पत्नीने पिऊन आलेल्या पतीचे गपचूप हातपाय बांधले त्यावर एक चादर टाकून रॉकेल ओतले आणि त्याला आग लावली. पत्नी येव्हड्यावरच थांबली नाही तर तिने घराच्या बाहेर जाऊन कडी ल;लावून घेतली आणि ती निघून गेली.
आगीमुळे शुद्धीवर आलेल्या पतीने जोरदार आरडाओरडा केला त्यानंतर शेजारी राहणाऱ्यांनी पतीच्या दिशेने धाव घेतली. आगीमुळे पतीचे शरीर चांगलेच भाजले होते. त्याला तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले. विनोद भारती असं त्या पतीचं नाव असून त्याची प्रकृती चिंताजनक आहे. पत्नीने त्याच्या सततच्या त्रासाला कंटाळून हे पाऊल उचलल्याचे समजते. झारखंडमधील चतरा जिल्ह्यातील जयपूर गावात हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला.
पोलिसांनी पत्नीला अटक केली असून तिने या आधी देखील पतीला मारण्याचा प्रयत्न केल्याची कबुली दिली आहे. पती सतत दारूच्या नशेत मारहाण करत असल्यामुळे हे टोकाचे पाऊल उचलल्याचे पत्नीने पोलिसांना सांगितले. शेजाऱ्यांनी देखील विनोद आपल्या पत्नीला मारहाण करत असलयाचे पोलिसांनी सांगितले आहे. पोलीस पुढील तपास करत आहेत.
0 Comments