माझी तुझी रेशीमगाठ' मालिकेतून बालकलाकार म्हणून प्रसिद्धी झोतात आलेली परी म्हणजेच मायरा वैकुळ सतत चर्चेत असते.
मालिकेतील परीनं म्हणजेच मायरानं अगदी कमी कालावधीत सगळ्यांची मनं जिंकली आहेत. मायराच्या निरागसतेनं आणि अभिनयानंही प्रेक्षकांनी मनं जिंकली असून तिचा चाहतावर्गही मोठ्या प्रमाणात वाढला आहे. मायराची प्रत्येक पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल होत असते. अशातच मायराने सोशल मीडियावर नवा व्हिडीओ शेअर केला असून यामध्ये ती वानरांसोबत मजा करताना दिसत आहे.
मायरा सध्या तिच्या कुटुंबासोबत फॅमिली ट्रीपवर आहे. मायरानं या ट्रिपमधील एक व्हिडीओ तिच्या इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये दिसतंय की मायरा गाडीमध्ये मजा करतेय. गाडीमध्ये मायराचे आई-वडिलही तिच्यासोबत आहेत.
त्यांच्या गाडीवर काही वानर उड्या मारताना दिसत आहेत. मायराही त्यांच्यासोबत मजा करताना दिसतेय. मायरानं हा व्हिडीओ शेअर करताच तो व्हायरल झाला आहे. तिच्या या व्हिडीओवर नेटकऱ्यांच्या अनेक प्रतिक्रिया येत आहेत.
0 Comments