मुंबई-अहमदाबाद महामार्गावरील विरार फाटा येथे शनिवारी सकाळी साडेअकरा वाजेच्या सुमारास कारमधून घरी जात असताना आई व चिमुकली पडल्याने आई गंभीर जखमी झाली तर १० महिन्यांच्या चिमुकलीचा मृत्यू झाला आहे.
मात्र या दोघी पडल्या की त्यांना ढकलले हे अद्याप स्पष्ट झाले नसून मांडवी पोलीस तपास करत आहे.
वाडा येथे राहणाऱ्या सोनाक्षी वाकडे (२०) या १० महिन्यांच्या लावण्या या चिमुकलीसह मुंबई-अहमदाबाद महामार्गावरील मनोरमार्गे कारने शनिवारी सकाळी जात होते. विरार फाटा येथील नोव्हेल्टी हॉटेलसमोर दोघीही कारमधून पडल्या. त्याचवेळी पाठीमागून जाणाऱ्या महामार्ग पोलिसांच्या वाहनाने त्यांना पाहिले व दोघींनाही नालासोपारा येथील महापालिकेच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. रुग्णालयात १० महिन्यांच्या चिमुकलीचा मृत्यू झाला तर जखमी आईवर उपचार सुरू आहेत.
0 Comments