बनावट दारूचा कारखाना उध्वस्त, दीड कोटींचा मुद्देमाल जप्त

 


आगामी नववर्षाच्या स्वागतासाठी नागरिक आणि विशेषतः मद्यप्रेमी सज्ज होत असताना एक मोठी बातमी समोर आली आहे. राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या नाशिक विभागीय भरारी पथकाने पारोळाजवळ बनावट देशी दारू कारखाना उध्वस्त केला आहे.

कारवाईत जवळपास १ कोटी ६४ लाखांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला असून २२ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, बनावट दारू कारखानामागे काहीतरी मोठा राजकीय वरदहस्त असल्याची शक्यता व्यक्त होत आहे.

निरीक्षक, राज्य उत्पादन शुल्क, विभागीय भरारी पथक, नाशिक विभाग, नाशिक या पथकाने दि. २४ डिसेंबर रोजी मौजे पारोळा नगरपरिषद हद्यीतील धुळे- नागपुर महामार्गालगत असलेल्या गट नं. १८१ मधील प्लॉट नं.१,२ व ३ या मिळकतीमध्ये असलेल्या पत्र्याच्या गोडावूनमध्ये पारोळा शिवार, पारोळा, ता. पारोळा, जि.जळगाव या ठिकाणी छापा टाकुन बनावट मद्य तयार करणारा कारखाना उध्दवस्त केला.


Post a Comment

0 Comments