चंदाबाई पांडुरंग बिरदवडे या महिलेचा या दुर्घटनेत मृत्यू झाला आहे. प्राथमिक माहिती देताना, देवाडे म्हणाले की, आज रात्री 20:30 वा. सुमारास रानुबाई मळा, चाकण येथे भाऊ परशुराम बिरदवडे यांच्या राहत्या घरी गॅस सिलेंडरचा स्फोट होऊन घरातील त्यांची पत्नी लक्ष्मीबाई भाऊ बिरदवडे हिच्या डोक्यात किरकोळ मार लागलेला असून त्यांचा मुलगा तुकाराम परशुराम बिरदवडे हा किरकोळ जखमी झालेला आहे. तर सून संगीता सुरेश बिरदवडे हिच्या पायास जखम झाली असून नातू अक्षय सुरेश बिरदवडे हा गंभीरित्या भाजलेला आहे. तसेच त्यांची नात वैष्णवी उर्फ ताई सुरेश बिरदवडे ही किरकोळ जखमी झालेली आहे.
सदरचा स्फोट हा खूप मोठ्या स्वरूपाचा असल्याने त्यामुळे घराची पडझड झालेली आहे. घराच्या भिंती तुटून शेजारील अंजाबाई प्रभाकर केळकर यांच्या घरावर पडल्याने त्या जखमी झालेल्या आहेत. तर शेजारी राहणार्या चंदाबाई पांडुरंग बिरदवडे यांच्या घरावर भिंत पडून त्यांच्या घराची भिंत अंगावर कोसळल्याने त्या मयत झाल्या आहेत .सर्व जखमींना हॉस्पिटलमध्ये रवाना केलेले आहे.
देवाडे म्हणाले की, मुलगा अक्षय बिगरडे याला 90 टक्के भाजले असल्याने त्याला भोसरी येथील बर्न्स हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी पाठवण्यात आले आहे. तर इतरांना चाकण व निगडी येथील हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी पाठवण्यात आले आहे. चाकण पोलीस ठाण्याचे सात अधिकारी व 25 अंमलदार घटनास्थळी दाखल झाले आहेत.
0 Comments