भाईंदर पूर्वेच्या न्यू गोल्डन नेस्ट येथील ओम साई कमर्शियल संकुलात प्रताप बेहरवानी (७५) यांचा सोन्याचे दागिने बनवून देण्याचा व्यवसाय आहे. त्यांच्याकडे काम करणारा कारागीर जितेंद्र हा ६० ग्रॅम वजनाचे व दिड लाख किमतीचे सोने चोरून पळून गेला होता.
त्याचा मोबाईल बंद होता. इतक्या जोखमीचे काम असतानादेखील मालकाने कारागिराचे पूर्ण नाव - पत्ता, ओळख पुरावा आदी काही घेतले नव्हते. पोलीस पडताळणीही केली नव्हती. मात्र, पोलिसांनी आता त्या कारागिराला अटक केली आहे.
वरिष्ठ पोलीस निरीक्षक मिलिंद देसाई, निरीक्षक प्रकाश मासाळ, सहायक निरीक्षक योगेश काळे, उपनिरीक्षक अभिजित लांडे व पोलीस पथकाने त्याचा शोध घेऊन नालासोपारा येथून २१ डिसेंबर रोजी अटक केली. जितेंद्र कांथी पिल्ली (३८) रा- विजयनगर, नालासोपारा पूर्व असे आरोपीचे नाव असून पोलिसांनी त्याने चोरलेले ६० ग्राम सोने हस्तगत केले आहे.
0 Comments