ट्रकभर गुटखा आणला खरा; मात्र पोलीसांनी पकडला

 


रबाळे एमआयडीसी पोलिसांनी गुटक्याचा ट्रक पकडला असून ६३ लाखांचा ऐवज जप्त केला आहे. या प्रकरणी एकास अटक केले असून चार फरार आहेत. एवढ्या मोठ्या प्रमाणात गुटका पकडला जाण्याची ही गेल्या काही महिन्यातील पहिलीच वेळ आहे.

सागर गोहेल असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.

रबाळे एमआयडीसी परिसरात गस्त घालत असताना एक संशयित ट्रक नजरेस पडला होता. ट्रकचालक व काही व्यक्तीचे बोलणे सुरु होते. यासर्व संशयास्पद हालचाली लक्षात आल्यावर हि बाब गस्त पोलिसांनी वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुधीर पाटील यांना कळवली. त्यांनी तत्काळ गुन्हे प्रगटीकरण विभागाचे पोलीस उपनिरीक्षक दीपक शेळके, हवालदार कृष्णा गायाक्द्वाद , सतीश गायकवाड पोलीस नाईक हुसेन तडवी, मुजीब सय्यद हे पथक रवाना केले. दरम्यान पोलीस पथकाने सापळा रचल्याचे लक्षात येताच ट्रक चालक शौकत आणि इतर चार जण एका कारमध्ये बसून पळून गेले. तर ज्याने ट्रकमधील माल घेतला तो पोलिसांच्या हाती सापडला. त्याचे नाव सागर गोहेल आसल्याचे समोर आले. त्याने पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार ट्रक चालक शौकत याने माल दिल्याची माहिती दिली. सदर ट्रक मध्ये पाहणी केली असता राज्यात प्रतिबंधित असलेला गुटखा असल्याचे निदर्शनास आले.

गुटक्याची मोजणी केली असता एकूण ५१ लाख ३६ हजार १३२ रुपयांचा गुटखा असल्याचे समोर आले. तर ट्रक (जी.जे.०१ जे टी २५७०) १० लाखांचा असा ६१ लाख ३६ हजार १३२ रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे. सदर ट्रकचा क्रमांक पाहता हा गुटखा गुजरात हून आला होता. मात्र कोणी पाठवला या मागे कोण आहे ? पळून गेलेल्या लोकांचा यात काय सहभाग आहे. याबाबत तपास सुरु आहे, अशी माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुधीर पाटील यांनी दिली.


Post a Comment

0 Comments