औरंगाबाद जिल्ह्यात गुन्हेगारी प्रमाणात मोठी वाढ झाली आहे. मागच्या काही दिवसांपासून खून, गुंडगिरी आणि चोऱ्यांच्या प्रमाणात वाढ झाल्याने औरंगाबादकरांना चांगलाच धसका बसला आहे.
दरम्यान यामुळे कायदा व सुव्यवस्थेचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. दरम्यान औरंगाबाद जिल्ह्यातील महत्वाचे शहर म्हणून ओळखले जाणाऱ्या पैठणमधील नेहरू चौकात भर रस्त्यात महिलेच्या डोक्यात फावडे मारून खून करण्यात आला आहे. ही घटना सकाळी 7 च्या दरम्यान घडली आहे. याबाबत पोलिसांना माहिती मिळाल्याने पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत.
0 Comments