शाळेत किंवा क्लासमध्ये प्रत्येक शिक्षकांची मुलांना शिकवण्याची स्टाईल वेगवेगळी असते. काही शिक्षक अतिशय प्रेमाने मुलांना समजेपर्यंत शांतपणे समजावून सांगतात. तर काही शिक्षक फक्त फळ्यावर लिहून त्याआधारे समजावून सांगतात.
आता हे सगळे ठिक आहे सोशल मीडियावर नुकताच एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. त्यामध्ये एक अगदीच लहान मुलगी आपल्या वर्गात पुढे उभे राहून मुलांना आकडे म्हणायला शिकवत आहे. तिच्यामागे मुलेही आकडे म्हणत असताना व्हिडिओमध्ये ऐकू येते. अवघ्या ३ ते ४ वर्षाच्या या मुलीचा आवाज तर खणखणीत आहेच पण ती अतिशय जोशात मुलांकडून हे आकडे म्हणून घेत आहे. बोबड्या सूरात तिचे हे आकडे ऐकायला छान वाटतात आणि तिच्या उत्साहाचेही आपल्याला कौतुक वाटल्याशिवाय राहत नाही. शाळेचा गणवेश आणि टाय घातलेली ही लहानगी पूर्ण जीव तोडून ओरडून आकडे म्हणत आहे.
ट्विटरवर गुलजार साहब या ट्विटर अकाऊंटवर हा व्हिडिओ शेअर कऱण्यात आला असून हा व्हिडिओ अवघ्या २९ सेकंदांचा आहे. एका आठवड्यात हा व्हिडिओ २० हजार जणांनी पाहिला असून असंख्य जणांनी तो लाईक आणि रिट्विटही केला आहे. बऱ्याच जणांनी या व्हिडिओला हार्टच्या इमोजी प्रतिक्रियांमध्ये देत आपली पसंती दर्शवली आहे. तर व्हिडिओला कॅप्शन देताना छोट्या मुलीचा जोश तर पाहा असे म्हटले आहे.
0 Comments