महिलेवर चाकू हल्ला केल्याप्रकरणी एकाला सहा महिन्यांची शिक्षा

 


रूग्णालयात उपचारार्थ दाखल मुलीसाठी जेवणाचा डबा घेऊन जाणाऱ्या महिलेवर चाकू हल्ला केल्याप्रकरणी सिताराम अभिमन कोळी (४६, रा.

डांभूर्णी, ता. यावल) याला अतिरिक्त सत्र न्यायाधीश एस.एस.सापटनेकर यांनी सोमवारी सहा महिने सश्रम कारावास व ५ हजार रूपये दंडाची शिक्षा सुनावली आहे.

सुरेखा सोनवणे या १४ ऑक्टोंबर २०१५ रोजी रूग्णालयामध्ये उपचारार्थ दाखल मुलीला जेवणाचा डबा घेऊन रिक्षाने जात होत्या. अचानक रिक्षामध्ये महिलेच्या मुलीचे चुलत सासरे सिताराम कोळी हे बसले. त्यांनी पिशवितून चाकू काढून महिलेवर चाकूने वार करून गंभीर जखमी केले. त्यानंतर महिलेच्या फिर्यादीवरून १५ ऑक्टोंबर २०१५ रोजी एमआयडीसी पोलीस ठाण्यात भादंवि. ३०७, ५०४, ५०६ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता.


Post a Comment

0 Comments