लीफ्टमध्ये अडकलो तर? हा विचारही आपल्याला भीतीदायक वाटतो. या भीतीने अनेकजण एकट्याने लिफ्टमध्ये जायला घाबरतात. लिफ्ट बंद पडल्यास त्या बंद जागेत जीव गुदमरणे, श्वास घ्यायला अडचण येणे, स्वाभाविक आहे.
व्हायरल होणारा हा व्हिडीओ गाझियाबाद येथील आहे. या व्हिडीओमध्ये तीन लहान मुली लिफ्टमध्ये अडकल्याचे दिसत आहेत. लिफ्ट अचानक बंद पडल्याने या मुली घाबरल्याचे पण नंतर एकमेकींना धीर देत असल्याचे व्हिडिओमध्ये दिसत आहे. या मुलींचे अशा परिस्थितीतही न घाबरता एकमेकींना धीर देण्याचे आणि तिथून बाहेर पडण्याचे प्रयत्न पाहून नेटकऱ्यांनी त्यांचे कौतुक केले आहे. पाहा व्हायरल होणारा हा व्हिडीओ.
0 Comments