राष्ट्रीय महामार्गावर एक कंटेनर ड्राइव्हरशिवाय जवळपास एक किलोमीटर धावल्याचा धक्कादायक थरार कॅमेऱ्यात कैद झाला आहे. या कंटेनरने महामार्गावरील अनेक खांबासह झाडे आणि दुकांनाना धडक दिली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, महामार्गावर ड्राइव्हरशिवाय धावणाऱ्या कंटेनरमध्ये भंगार भरलेलं होतं. कंटेनर भरधाव वेगात असताना चालकाचे त्यावरील नियंत्रण सुटलं आणि कंटेनर आवरणं अशक्य वाटल्यामुळे त्याने स्वत:चा जीव वाचवण्यासाठी चालू कंटेनरमधून उडी मारली. ड्राइव्हरने उडी मारली तरीदेखील कंटेनर महामार्गावर वेगाने धावतच राहिला.
0 Comments