उमरखेड तालुक्यातील सर्व शाळेवरील शिक्षक कर्मचाऱ्यांना मुख्यालयी राहण्याचे आदेश द्या! मनसेची मागणी


उमरखेड (ओंकार देशमुख) :

उमरखेड तालुक्यातील सर्व शाळेवरील शिक्षक कर्मचाऱ्यांना मुख्यालयी राहण्याचे आदेश देण्यात यावे अन्यथा आपल्या कार्यालयासमोर आंदोलन करण्यात येईल असा इशारा उमरखेड तालुका मनसे अध्यक्ष शेख सादिक डेव्हिड शहाणे, राजु पिटलेवाड यांच्या नेतृत्वात  निवेदनात शिक्षणाधिकारी यांना निवेदनाद्वारे देण्यात आला .  

तालुक्यातील प्राथमिक शाळेपासुन ते उच्च माध्यमिक शाळेवरील शिक्षक शिक्षक आपल्या मुख्यालयी राहत नाहीत. मात्र घरभाडे मुख्यालयाचे घेतात . कर्मचारी मुख्यालयी राहावे यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी आदेश दिले होते . मात्र शिक्षक कर्मचाऱ्यांकडून या आदेशाची अंमलबजावणी करण्यात आलेली नाही . 

मुख्यालयी न राहणाऱ्या कर्मचारी यांना सात दिवसांत मुख्यालयी राहण्याचे आदेश यावा अन्यथा शिक्षणाधिकारी यांच्या कार्यालयासमोर आंदोलन करण्यात येईल असा इशारा मनसे पदाधिकाऱ्यांनाकडून देण्यात आला .

विद्यार्थ्यांना योग्य शिक्षण मिळावे यासाठी शासनाकडून अनेक योजना राबविल्या जातात मात्र शिक्षकच उपस्थित नसल्याने विद्यार्थ्यांना शिक्षणासंबंधीच्या अनेक अडचणी निर्माण होतात . मुख्यालयी शिक्षक हजर राहत नसल्याने विद्यार्थ्यांचे नुकसान होते असल्याची ओरड पालकवर्गातुन नेहमी होते . शिक्षक आपल्या गावी जात असल्याने त्यांना शाळेच्या वेळात येणे शक्य होत नाही त्यामुळे शिक्षणाधिकाऱ्यांनी  या विषयाची गंभीरता लक्षात घेणे गरजेचे आहे असे मत मनसे पदाधिकाऱ्यांकडून निवेदणात मांडले आहे.

Post a Comment

0 Comments