ट्रेलर अडवून चोरला लाखो रुपयांचा माल , सहा जणांवर गुन्हा दाखल

 


याबाबत तुळशीराम चोरमरे, वय 33 वर्षे, रा. नागपुर यांनी चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. सहा अनोळखी इसमांच्या विरोधात भा. द. वि. कलम 395, 365, 341, 323, 506 भा. च. का. क 4(25) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

फिर्यादी यांच्या 10 लाख रुपये किंमतीचा 16 टायर असलेल्या ट्रेलर मधून 9.60 लाख रुपये किंमतीचे 32 टन लोंखंडी अँगल आळंदी येथे कपंनीत उतरवण्यासाठी जात होते. त्यावेळेस एका लाल रंगाच्या चार चाकी गाडीतून आलेल्या सहा अनोळखी इसमांनी रस्ता अडवून, तलवारीचा धाक दाखवून जबरदस्तीने फिर्यादीला व त्याच्या सोबत असणाऱ्या गाईडला ट्रेलर मधून खाली ओढून त्याच्या चार चाकी गाडी मध्ये बसवून मारहाण करून फिर्यादीच्या खिशातील 1,600 रुपये रोख व 8,000 रुपये किंमतीचे मोबाईल फोन जबरदस्तीने काढुन घेतले. तसेच 9.60 लाख रुपये किंमतीचा माल आरोपींनी लंपास केला. त्यानंतर फिर्यादी व सोबत असणाऱ्या गाईडला शिरोली फाट्यापासून 3 ते 4 किलोमीटर अंतरावर दमदाटी करून माळरानावर नेऊन सोडले.

Post a Comment

0 Comments