तीन वर्षांच्या पोटच्या लेकराने वाचवMaharashtra ला आईचा जीव

 


लहान मुले म्हणजे देवाघरची फुले असं आपण कित्येकदा म्हणतो किंवा लहानपणी शाळेत हे वाक्य ऐकले असेल. लहान मुले एखाद्या गोष्टीवर किंवा घटनावर लगेच व्यक्त होतात. असंच एका लहान मुलाने आपल्या आईचा जीव वाचवला आहे.

घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाला असून एक महिला शिडीवर चढून काहीतरी दुरूस्तीचे काम करत आहे. तर काम करता करता शिडी खाली पडते आणि महिला वरंच लटकलेली दिसत आहे. ती आरडाओरड करताना आपल्याला दिसत आहे. पण तिथे उभ्या असेलेल्या लहान मुलाने पळत जात शिडी उभी केली आणि आपल्या आईला मदत केली आहे.

शिडी अवजड असतानाही या मुलाने संपूर्ण ताकद लावून शिडी उचलली आणि वर लटकलेल्या आपल्या आईचा जीव मुठीत पडला. हा व्हिडिओ सध्या चांगलाच व्हायरल झाला आहे. तर या मुलाचे नेटकऱ्यांनी कौतुक केले आहे. अनेकजणांनी आपल्या प्रतिक्रिया या व्हिडिओर व्यक्त केल्या आहेत.


Post a Comment

0 Comments