२४ लाख ७७ हजारांची घरफोडी

 


ख्रिसमस साजरा करण्यासाठी बाहेर गेल्यानंतर खिडकीचे गज वाकवून चोरट्यांनी तब्बल 24 लाख 77 हजारांचा ऐवज लंपास केला. हा धक्कादायक प्रकार मोहम्मदवाडीतील न्याती व्हिक्टोरीया हाऊस नंबर 32 येथे घडला.

याप्रकरणी कोंढवा पोलीस ठाण्यात एका 47 वर्षीय महिलेनी तक्रार दिली आहे.

ख्रिसमस निमित्त फिर्यादी आपल्‍या कुटुंबियांसमवेत चर्चमध्ये प्रार्थना करण्यासाठी शनिवारी रात्री गेल्‍या होत्‍या. हीच संधी साधून चोरटे त्यांच्या घराच्या घराच्या पहिल्या माळ्यावरील चढले. तेथे त्यांनी बेडरूमच्या खिडकीचे दोन गज तोडून ते वााकवून खिडकीवाटे आत प्रवेश केला.

या वेळी घरातील लोखंडी तिजोरी चोरट्यानी तोडून त्यातील १२ हजारांची रोकड आणि हिर्‍यांचे दागिने असता २४ लाख ७७ हजार रुपयांचा ऐवज लंपास केला. चर्चमधून फिर्यादी घरी परतल्यानंतर त्याच्या घरात चोरी झाल्याचा प्रकार लक्षात आल्यानंतर त्यांनी तात्काळ याबाबत कोंढवा पोलिसांना याची माहिती दिली.

Post a Comment

0 Comments