पती व सासूची हत्या केल्याची पत्नीसह प्रियकराची कबुली

 


अनैतिक संबंधाला अडसर ठरणाऱ्या कमलकांत कपूरचंद शहा या ४७ वर्षांच्या पतीच्या हत्येच्या गुन्ह्यात पोलीस कोठडीत असलेली आरोपी पत्नी कविता ऊर्फ काजल कमलकांत शहा आणि तिचा प्रियकर हितेश शांतीलाल जैन या दोघांनी सासूचीही खाण्या-पिण्यातून अर्सेनिक आणि थेलियम धातूचा वापर करुन हत्या केल्याचे तपासात उघडकीस आले आहे.

त्यामुळे या दोघांवर आता दुहेरी हत्येचा गुन्हा नोंदविण्यात येणार आहे. कमलकांत शहा हे व्यवसायाने कापड व्यापारी असून ते सांताक्रुज येथील दत्तात्रय रोड, इंडियन बँकेसमोरील गणेशकृपा इमारतीमध्ये राहत होते. कविता ही त्यांची पत्नी असून तिचे हितेशसोबत अनैतिक संबंध होते. या दोघांच्या संबंधाला कमलकांत हे अडसर होते. त्यामुळे या दोघांनी कमलकांत यांच्या हत्येची योजना  बनविली होती.

Post a Comment

0 Comments