शाळकरी विद्यार्थ्यासमोरच शिक्षिका एकमेकींशी भिडल्या

 


शाळकरी मुलांना आपण कोणत्या ना कोणत्या कारणावरून एकमेकांशी भांडताना अनेकवेळा पाहिलं आहे. कारण लहान मुलांना कोणत्याही गोष्टीवरुन लगेच राग येतो, त्यामुळे ते चिडताता आणि भांडण करतात.

कधी कधी या भांडणाचे रुपांतर मारहाणीत झाल्याचंही आपण पाहिलं आहे. अशा परिस्थितीत शिक्षक मुलांची भांडणे मिटवतात. पण सध्या एक असा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ज्यामध्ये शाळकरी विद्यार्थ्यांसमोरच दोन महिला शिक्षिका एकमेकांशी भिडल्याचं पाहायला मिळतं आहे.

सध्या हा व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून अनेकांनी या दोन्ही शिक्षिकांवर टीका केली आहे. शिवाय अशा शिक्षकांपासून विद्यार्थ्यांनी काय धडा घ्यायचा? असा प्रश्न नारिकांनी उपस्थित केला आहे. धक्कादायक बाब म्हणजे या या दोन शिक्षिका एकमेकांना मारहाण करत असल्याचं पाहून शाळेतील लहान मुलं घाबरलेली दिसतं आहेत. शिवाय ही लहान मुलं आणि तिथे उपस्थित असणारे इतर लोक या महिला शिक्षिकांना भांडू नका, असं सांगत असल्याचं व्हिडीओमध्ये पाहायला मिळतं आहे. मात्र, तरीही या महिला शिक्षिका एकमेंकींना मारहाण करणं थांबवत नाहीत.

मिळालेल्या माहितीनुसार, हा व्हिडिओ उत्तर प्रदेशातील कासगंज येथील असून व्हिडिओमध्ये दोन महिला शिक्षिका शाळेतच भांडताना दिसत आहेत. शाळेच्या आवारात उपस्थित एका मुलीने त्यांच्या या भांडणाचा थरार मोबाईलच्या कॅमेऱ्यात कैद केला आहे. जो सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

महिला शिक्षिकांच्या मारहाणीचा हा व्हिडीओ संतोष सिंह नावाच्या ट्विटर अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला आहे. हा व्हिडीओ शेअर करताना कॅप्शनमध्ये म्हटलं आहे की, या महिला सरकारी शिक्षिकांमध्ये मारहाण का सुरू आहे ते माहिती नाही. मात्र, या सरकारी शाळेत शिकणाऱ्या मुलांच्या भविष्याचा अंदाज येत आहे, तो म्हणजे या मुलांचं भविष्य देवाच्या भरवशावर आहे.

दरम्यान, कासगंजमधील सरकारी शाळेतील या महिला शिक्षिका आपापसात भाडंत होत्या. मात्र, त्यांच्या या भांडणाचे परिणाम काय होतील याचा विसर त्यांना पडल्याचं दिसतं आहे. हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर नेटकरी चांगलेच भडकले आहेत. ‘अशा लोकांना शिक्षक बनवू नये, त्याचा मुलांवर खूप वाईट परिणाम होतो’ असं एका नेटकऱ्यानं म्हटलं आहे तर आणखी एका ट्विटरधारकाने म्हटलं आहे की, ‘अशा शिक्षकांवर त्वरित कारवाई करावी. मुले त्यांच्याकडून काय शिकतील आणि त्यांचा आदर काय करतील.’

Post a Comment

0 Comments