वारंवार लग्नाचा तगादा लावत होती म्हणून प्रियकराने सुपारी देऊन प्रेयसीची हत्या केल्याची धक्कादायक घटना उत्तर प्रदेशातील कानपूरमध्ये घडली आहे.
आरोपी महिलेला स्कूटीवर बसवून स्वतः मारेकऱ्यांकडे घेऊन गेला, तेथे गोळी झाडून तिची हत्या करण्यात आली. मयत महिला आणि आरोपी गेल्या पाच वर्षांपासून लिव्ह इन रिलेशनशीपमध्ये राहत होते.
या घटनेचा पोलिसांकडून कसून तपास केला जात आहे. घटनेचे वृत्त परिसरात पसरल्यानंतर सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. याचवेळी प्रियकराच्या कृत्यावर संताप देखील व्यक्त होत आहे.
0 Comments